लातूरच्या एनसीसी प्रशिक्षण शिबिरात सायबर सुरक्षा जनजागृती सत्र; कर्नल Y. B. सिंह यांच्या हस्ते सायबर वॉरियर्सचा विशेष सत्कार.
एनसीसीच्या १० दिवसीय प्रशिक्षण शिबिरादरम्यान १५० हून अधिक एनसीसी कॅडेट्ससाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात सायबर वॉरियर योगिता जाधव आणि सायबर वॉरियर प्राजक्ता बोरूळे यांनी कॅडेट्सना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक व गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे तसेच डिजिटल व्यवहार करताना आवश्यक खबरदारी घेणे, याबाबत कॅडेट्सना माहिती देण्यात आली. सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांचीही माहिती देण्यात आली.
या मार्गदर्शन सत्राला एनसीसीचे सर्व स्टाफ उपस्थित होते. कॅडेट्सनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेबाबतचे मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कॅडेट्सच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
यावेळी कर्नल Y. B. सिंह यांनी सायबर वॉरियर्सचा विशेष सत्कार करून त्यांचा सन्मान केला. एनसीसी कॅडेट्समध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे सत्र प्रशिक्षण शिबिरातील महत्त्वपूर्ण उपक्रम ठरले.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता युवकांनी सायबर सुरक्षेचे मूलभूत नियम समजून घेणे आणि ऑनलाइन व्यवहारांमध्ये सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
