पिंप्राळा हुडकोतील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका ;डमी ग्राहकाच्या मिस्ड कॉलनंतर कारवाई; तीन ग्राहकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

डमी ग्राहकाच्या मिस्ड कॉलनंतर रामानंदनगर पोलिसांची कारवाई; पिंप्राळा हुडको परिसरातून चार महिलांची सुटका, सात जणांविरुद्ध कारवाई.

पिंप्राळा हुडको परिसरात पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेेसह दोन पुरुष आणि तीन ग्राहकांविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल.

 पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरात सुरू असल्याची माहिती मिळालेल्या कुंटणखान्यावर रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांची सुटका केली. या कारवाईदरम्यान घटनास्थळी तीन ग्राहक आढळून आले. त्यांच्यासह कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेसह दोन पुरुषांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (१ सप्टेंबर) ही कारवाई करण्यात आली.

माहिती मिळताच पोलिसांनी रचला सापळा

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, एएचटीयू विभागाच्या प्रभारी माधुरी बोरसे यांच्यासह पोलिस पथकाने कारवाईचे नियोजन केले.

डमी ग्राहकाच्या मिस्ड कॉलनंतर छापा

कारवाईपूर्वी पोलिसांनी एका डमी ग्राहकाला संबंधित घरात पाठविले. ठरल्याप्रमाणे त्याने पोलिसांना मिस्ड कॉल देताच घराबाहेर दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने तातडीने घरावर छापा टाकला.

छाप्यावेळी घरात चार महिला आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली. तसेच घटनास्थळी आढळलेल्या तीन ग्राहकांसह कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतले.

संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास रामानंदनगर पोलिसांकडून सुरू असून, कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची भूमिका आणि या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!