‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या संदेशातून मुकुंदराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल सवयी, ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडिया सुरक्षेबाबत मार्गदर्शन.
नांदगाव : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मुकुंदराज विद्यालय, नांदगाव येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, तसेच संशयास्पद फोन, संदेश आणि आकर्षक ऑनलाइन ऑफर्सपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, श्रेयश माकणे आणि प्राची भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले. दैनंदिन डिजिटल व्यवहारांमध्ये संभाव्य धोके ओळखणे आणि सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
संवादात्मक पद्धतीने झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शन करत डिजिटल माध्यमांचा वापर करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचा संदेश देण्यात आला.
“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश या जनजागृती उपक्रमातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
