शिवाजी माध्यमिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर क्विक हील फाउंडेशनच्या वतीने शिवाजी माध्यमिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तुषार वाघमारे यांनी लाईव्ह हॅकिंग डेमो सादर करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन जगातील संभाव्य सायबर धोके आणि त्यापासून सुरक्षित राहण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात व्हॉइस क्लोनिंग आणि डीपफेकिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर कोणत्या प्रकारे होऊ शकतो, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन गेमिंगसंदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत गेमिंग करताना कोणती काळजी घ्यावी, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना कोणती खबरदारी घ्यावी आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित कशी ठेवावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. डिजिटल जगाचा वापर करताना कुठे थांबायचे, कोणत्या गोष्टींपासून सावध राहायचे आणि सुरक्षित डिजिटल वापराची सुरुवात कशी करायची, याबाबत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान शाळेचे प्राचार्य आणि शिक्षकांशीही संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेबाबत योग्य मार्गदर्शन कसे करावे, तसेच ऑनलाइन जगातील संभाव्य धोक्यांपासून विद्यार्थ्यांना सावध कसे करावे, याबाबत शिक्षकांना माहिती देण्यात आली.
यावेळी क्विक हील फाउंडेशनच्या टीममधील तुषार वाघमारे, आदित्य माने, साहिल जाधव आणि परमेश्वर पांढरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे महत्त्व समजावून देत हा जनजागृती उपक्रम उत्स्फूर्त वातावरणात पार पडला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
