साहिल जाधव यांच्या प्रभावी सूत्रसंचालनातून इतिहासातील शौर्य आणि आधुनिक सायबर सुरक्षेचा संबंध मांडत विद्यार्थ्यांना डिजिटल जगात सतर्क राहण्याचा संदेश.
लातूर : क्विक हील फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सायबर युग’ इंडोर मास ॲक्टिव्हिटीमध्ये पारंपरिक युगातील संरक्षणाची संकल्पना आणि आजच्या डिजिटल युगातील सायबर सुरक्षेची सांगड घालत विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने डिजिटल सुरक्षेचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमामध्ये पूर्वीच्या काळातील मावळे किल्ले, राज्य आणि महत्त्वाची माहिती यांचे संरक्षण कसे करायचे, याची तुलना आजच्या काळातील ‘डिजिटल मावळ्यांनी’ आपला डेटा, सोशल मीडिया अकाउंट्स, मोबाईल आणि ऑनलाइन ओळख सुरक्षित कशी ठेवावी, यासोबत करण्यात आली.
पूर्वी शत्रूपासून किल्ल्यांचे संरक्षण करणे आवश्यक होते, तर आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांपासून वैयक्तिक आणि डिजिटल माहितीचे संरक्षण करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन साहिल जाधव यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या उत्साही आणि विषयाला साजेशा अँकरिंगमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. इतिहासातील शौर्य आणि आधुनिक काळातील डिजिटल सुरक्षेचा अनोखा संबंध त्यांनी आपल्या निवेदनातून विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडला.
‘तेव्हा किल्ल्यांचे रक्षण करणारे मावळे, आज डिजिटल जगाचे रक्षण करणारे डिजिटल मावळे!’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना डिजिटल जगात सतर्क राहण्याचे आणि आपल्या डिजिटल संपत्तीचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.
परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सायबर सुरक्षेचा संदेश देणारी ही इंडोर मास ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या अनुभवासह जनजागृती करणारी ठरली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
