‘सावध रहा, सुरक्षित रहा’ या संदेशातून क्विक हील फाऊंडेशनतर्फे लातूरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल जबाबदारीबाबत जनजागृती.
लातूर : क्विक हील फाऊंडेशनतर्फे श्री श्री गुजराती इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा आणि डिजिटल सेफ्टीबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यावेळी परमेश्वर पांढरे आणि कृष्णा पांढरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ऑनलाइन फसवणुकीच्या विविध पद्धती, डिजिटल सुरक्षेचे महत्त्व आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन केले.
सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून विविध सायबर धोक्यांची माहिती देण्यात आली. ऑनलाइन अभ्यास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी काय तपासावे आणि वैयक्तिक माहिती कोणासोबत शेअर करू नये, याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले.
तसेच मजबूत पासवर्ड आणि सुरक्षित अकाउंटचा वापर, सोशल मीडिया तसेच इतर डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी आणि ऑनलाइन व्यवहारांमध्ये आवश्यक असलेली सावधगिरी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
“सावध रहा, सुरक्षित रहा आणि डिजिटल जगाचा जबाबदारीने वापर करा,” असा संदेश देत विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल जबाबदारी आणि सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्विक हील फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अशा जनजागृतीपर उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
