ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी क्विक हील फाऊंडेशनचा शिरोळ ग्रामपंचायतीत अभिनव जनजागृती उपक्रम.
क्विक हील फाऊंडेशनतर्फे ग्रामपंचायत शिरोळ येथे नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाटकाच्या माध्यमातून सायबर गुन्हे आणि डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान परमेश्वर पांढरे यांनी नागरिकांना लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून विविध सायबर धोक्यांची माहिती दिली. मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करताना निष्काळजीपणा केल्यास वैयक्तिक माहिती कशा प्रकारे धोक्यात येऊ शकते, हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजावून सांगण्यात आले. लाईव्ह डेमो पाहून उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्नही विचारले.
यावेळी OTP, संशयास्पद लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षा, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
“डिजिटल जगात एक छोटीशी चूकही मोठ्या सायबर फसवणुकीला कारणीभूत ठरू शकते; त्यामुळे सतर्कता हीच डिजिटल सुरक्षेची पहिली पायरी आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने क्विक हील फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. नाटक, संवाद आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या जनजागृती कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
