दोन आठवड्यांत ६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती; पोलिसांच्या मार्गदर्शनातून डिजिटल सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती.
लातूर : Quick Heal Foundationच्या माध्यमातून सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेला गती मिळत असून, परमेश्वर पांढरे यांना महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने सायबर सुरक्षेबाबत संवादासाठी आमंत्रित करण्यात आले. यावेळी पोलिस अधिकारी आणि परमेश्वर पांढरे यांनी एकत्रितपणे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, डिजिटल सुरक्षेला निर्माण होणारे धोके आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली.
संवादादरम्यान डिजिटल सुरक्षेबाबत होणारी निष्काळजीपणा, लाईव्ह डेमोच्या माध्यमातून दाखवता येणारे सायबर धोके आणि सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पुढील काळात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये लाईव्ह डेमो, केस स्टडी आणि संवादाच्या माध्यमातून सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग, फिशिंग, बनावट लिंक, OTP फसवणूक आणि डिजिटल गोपनीयता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन जगात कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सुरक्षितता तपासणे आणि संशयास्पद डिजिटल व्यवहारांपासून सावध राहणे यावर विशेष भर देण्यात आला.
अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत ६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षा जनजागृती पोहोचवण्यात आली. पोलिसांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि Quick Heal Foundationच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली.
या उपक्रमातून “सतर्कता हीच डिजिटल सुरक्षेची पहिली पायरी” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. शाळा व महाविद्यालयांमध्ये भविष्यातही अशा प्रकारचे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम सातत्याने राबवण्याचा प्रयत्न सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
