विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता वाढवण्यासाठी लातूरमध्ये सायबर पोलिस, Quick Heal Foundation आणि युवा सायबर कार्यकर्त्यांमध्ये संवाद व सहकार्याचा उपक्रम.
लातूर : सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून कृष्णा पांढरे व परमेश्वर पांढरे यांनी सायबर पोलिस ठाण्यातील सायबर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सायबर गुन्ह्यांच्या विविध पद्धती, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, डिजिटल सुरक्षितता तसेच विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून सायबर सुरक्षेच्या विविध संकल्पना प्रत्यक्ष समजून घेण्यात आल्या. प्रत्यक्ष उदाहरणे आणि केस स्टडीच्या माध्यमातून सायबर गुन्हे कोणत्या पद्धतीने घडतात, त्यामागील कार्यपद्धती काय असते आणि अशा घटनांपासून नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत अनुभवांची देवाणघेवाण झाली.
सायबर पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेली प्रत्यक्ष माहिती आणि मार्गदर्शन आगामी सायबर सुरक्षा जनजागृती सत्रांमध्ये विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. Quick Heal Foundationच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक घटकांमध्ये सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती मोहिमेला या संवादातून अधिक व्यावहारिक दिशा मिळणार आहे.
सायबर गुन्ह्यांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असल्याने केवळ माहिती देण्यापेक्षा प्रत्यक्ष केस स्टडी, लाईव्ह डेमो आणि सायबर अधिकाऱ्यांचे अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या भेटीतून मिळालेल्या नव्या माहितीचा उपयोग आगामी Quick Heal Foundationच्या सायबर सुरक्षा सत्रांमध्ये करून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी आणि वास्तववादी पद्धतीने डिजिटल सुरक्षिततेचे धडे देण्याचा संकल्प करण्यात आला.
या उपक्रमामुळे सायबर पोलिस विभाग, Quick Heal Foundation आणि युवा सायबर जागरूकता कार्यकर्ते यांच्यातील संवाद व सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल समाज घडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
