लातूरमध्ये एरा इंटरनॅशनल स्कूलच्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
एरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पाचवी आणि त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात सायबर वॉरियर योगिता जाधव आणि सायबर वॉरियर प्राजक्ता बोरुळे यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल जगातील सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
ऑनलाइन जगात वावरताना कोणती काळजी घ्यावी, डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर कसा करावा तसेच सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडिया वापरताना वैयक्तिक माहितीची सुरक्षितता जपण्याचे महत्त्वही यावेळी समजावून सांगण्यात आले.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहाय्यक मुख्याध्यापक भोजने यांनीही उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
या सत्राचा लाभ ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
