८०० हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये सायबर सजगतेचा जागर; संवादातून मिळाले प्रभावी मार्गदर्शन

स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलमध्ये ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल, लातूर येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात सायबर वॉरियर योगिता जाधव आणि सायबर वॉरियर प्राजक्ता बोरुळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर तसेच इंटरनेटवरील संभाव्य धोक्यांबाबत मार्गदर्शन केले.

सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. द्विमार्गी संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण सत्र अधिक संवादात्मक आणि प्रभावी ठरले. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सायबर जनजागृतीचा उद्देश प्रभावीपणे साध्य झाल्याचे दिसून आले.

या उपक्रमाचा लाभ ८०० हून अधिक विद्यार्थ्यांना झाला. शाळेच्या प्राचार्यांनी देखील उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करताना सजग राहावे आणि ऑनलाइन जगातील संभाव्य धोक्यांची जाणीव ठेवावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!