संशयास्पद लिंक, वैयक्तिक माहितीचा गैरवापर आणि सोशल मीडिया फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी ज्ञानप्रकाश शाळेत सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन.
लातूर : ज्ञानप्रकाश शाळेत इयत्ता ८वी ते १०वीच्या ७५० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. Quick Heal Foundationच्या माध्यमातून परमेश्वर पांढरे यांनी विद्यार्थ्यांना लाईव्ह हॅकिंग डेमो दाखवत विविध सायबर धोक्यांबाबत सतर्क केले.
यावेळी ऑनलाइन गेमिंग, Instagram आणि Snapchatचा वापर करताना होणारी फसवणूक, बनावट प्रोफाइल, ऑनलाइन ब्लॅकमेलिंग तसेच वैयक्तिक माहितीचा गैरवापर याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली. सोशल मीडिया किंवा ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांकडून डिजिटल सुरक्षेला कशाप्रकारे धोका निर्माण होऊ शकतो, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना संशयास्पद लिंकपासून दूर राहणे, अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर न करणे, मजबूत पासवर्ड वापरणे आणि गोपनीयता सेटिंग्ज योग्य पद्धतीने ठेवणे याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, ऑनलाइन अडचण किंवा सायबर फसवणुकीची घटना घडल्यास घाबरून न जाता विश्वासू व्यक्ती किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला.
लाईव्ह डेमोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर धोक्यांचे स्वरूप आणि डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. सुरक्षित इंटरनेट वापरासाठी जागरूकता, सावधगिरी आणि जबाबदार डिजिटल वर्तन आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
