Quick Heal Foundationच्या सायबर सुरक्षा उपक्रमातून दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल वापराचा संदेश पोहोचवण्यात आला.
लातूर : Quick Heal Foundationच्या सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमांतर्गत ‘सायबर युगत’ इंडोर मास ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले. जाधव साहील व परमेश्वर पांढरे यांच्या व्यवस्थापनाखाली जवळपास दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, OTP स्कॅम, सोशल मीडिया सुरक्षा, बनावट लिंक आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, संशयास्पद लिंकपासून कसे दूर राहावे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करत संवादात्मक पद्धतीने सायबर सुरक्षेचे धडे देण्यात आले. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध मुद्द्यांवर संवाद साधत डिजिटल सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वपूर्ण सवयी समजावून सांगण्यात आल्या.
Quick Heal Foundationच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता निर्माण करून सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल वापराचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने ‘सायबर युगत’ इंडोर मास ॲक्टिव्हिटी महत्त्वपूर्ण ठरली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
