लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे ऑनलाइन फसवणूक व सायबर हल्ले कशा प्रकारे होऊ शकतात, याचे प्रात्यक्षिक दाखवत विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेचे धडे देण्यात आले.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर क्विक हील फाउंडेशनच्या वतीने श्री श्री रविशंकर स्कूलमध्ये इयत्ता ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांशी सायबर सुरक्षेबाबत संवाद साधत ऑनलाइन जगतातील विविध धोके आणि त्यापासून सुरक्षित राहण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात तुषार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य माने, साहिल जाधव, नेहल बुलानी, नम्रता तोर आणि परमेश्वर पांढरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक आणि सायबर हल्ले कोणत्या प्रकारे होऊ शकतात, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा सुरक्षित वापर, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, संशयास्पद लिंक व संदेशांपासून सावध राहणे तसेच डिजिटल जगात सुरक्षित आणि जबाबदार वर्तन कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहून डिजिटल साधनांचा जबाबदारीने वापर करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
