“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून शिडोळ ग्रामस्थांना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची व वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शिडोळ गावात सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांना ऑनलाइन फसवणूक, बनावट फोन कॉल, ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट योजना तसेच सोशल मीडिया फसवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
डिजिटल व्यवहार करताना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि कोणत्याही संशयास्पद फोन कॉल किंवा संदेशाला प्रतिसाद देण्यापूर्वी त्याची खात्री करावी, याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.
या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, श्रेयस माकणे आणि प्राची भोसले यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल व्यवहारांमध्ये आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
