“सायबर सुरक्षिततेची सुरुवात जागरूकतेपासून होते” या संदेशातून विद्यार्थ्यांना डिजिटल जगात जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वावरण्याचे आवाहन करण्यात आले.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा विषयक पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. या पुस्तिकांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया सुरक्षितता तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती देण्यात आली.
या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी आणि श्रेयस माकणे यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत मिळालेली माहिती आपल्या पालकांपर्यंत तसेच समाजातील इतरांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
“सायबर सुरक्षिततेची सुरुवात जागरूकतेपासून होते,” असा संदेश देत विद्यार्थ्यांना डिजिटल जगात जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वावरण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
