ग्रामीण भागात सायबर जनजागृतीचा जागर

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून ग्रामीण नागरिकांना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची व वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

 वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, बनावट फोन कॉल, ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट सरकारी योजना तसेच सोशल मीडिया फसवणुकीबाबत माहिती देण्यात आली.

डिजिटल व्यवहार करताना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि संशयास्पद संदेश किंवा फोन कॉलपासून सावध राहावे, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, श्रेयस माकणे आणि प्राची भोसले यांनी नागरिकांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी डिजिटल व्यवहार करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!