राजा नारायण लावटी स्कूलमध्ये सायबर जनजागृती; लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; API अधिकारी भालचंद्र तेडके सर व प्राचार्यांच्या हस्ते परमेश्वर पांढरे यांचा सत्कार

परमेश्वर पांढरे यांनी लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे दिले; API अधिकारी भालचंद्र तेडके व प्राचार्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार.

राजा नारायण लावटी स्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल फसवणूक आणि सायबर धोक्यांपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन.

 राजा नारायण लावटी स्कूलमध्ये Quick Heal Foundationच्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परमेश्वर पांढरे यांनी विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह हॅकिंगचे प्रात्यक्षिक सादर करत सायबर गुन्हे आणि डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना फिशिंग, बनावट लिंक, पासवर्ड सुरक्षा, सोशल मीडिया तसेच ऑनलाइन फसवणुकीच्या विविध पद्धतींबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. लाईव्ह डेमोच्या माध्यमातून डिजिटल जगतातील संभाव्य धोके विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच, ऑनलाइन व्यवहार करताना आणि सोशल मीडिया वापरताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या उल्लेखनीय सायबर जनजागृती कार्याबद्दल API अधिकारी भालचंद्र तेडके सर आणि शाळेचे प्राचार्य सर यांच्या हस्ते परमेश्वर पांढरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेसंदर्भात विविध प्रश्न विचारले.

डिजिटल युगात सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता आवश्यक आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. Quick Heal Foundationच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!