‘सायबर मावळी दिंडी’तून डिजिटल सुरक्षेचा जागर; परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; मावळी मायभक्तांमध्ये सायबर जनजागृती

लातूरमध्ये कृष्ण पांडरे यांच्या पुढाकाराने Quick Heal Foundationच्या माध्यमातून आयोजित ‘सायबर मावळी दिंडी’तून मावळी मायभक्तांसह नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, OTP, बनावट लिंक, फिशिंग आणि सोशल मीडिया सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.

‘सायबर मावळी दिंडी’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; OTP व पासवर्ड शेअर न करणे, अनोळखी लिंक टाळणे आणि ऑनलाइन व्यवहारात सतर्क राहण्याचे आवाहन.

 पारंपरिक मावळी दिंडीच्या परंपरेला आधुनिक डिजिटल युगाची जोड देत कृष्ण पांडरे यांच्या पुढाकाराने Quick Heal Foundationच्या माध्यमातून अनोख्या ‘सायबर मावळी दिंडी’ चे आयोजन करण्यात आले. या अभिनव उपक्रमातून मावळी मायभक्तांसह नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली.

मावळींची दिंडी ही श्रद्धा, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानली जाते. याच भावनेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ‘सायबर मावळी’ ही संकल्पना साकारण्यात आली. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, OTP, फिशिंग, सोशल मीडिया फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या गैरवापराचे धोकेही वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP व पासवर्ड कोणालाही न सांगणे, संशयास्पद संदेश व कॉलपासून सावध राहणे तसेच ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेणे, याबाबत दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

‘जशी आपल्या संस्कृतीची सुरक्षा महत्त्वाची, तशीच आपल्या डिजिटल विश्वाची सुरक्षा देखील महत्त्वाची’, हा संदेश या उपक्रमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. परंपरा आणि आधुनिक डिजिटल सुरक्षेचा संगम साधत नागरिकांना सुरक्षित डिजिटल व्यवहारासाठी जागरूक करण्यात आले.

या अभिनव उपक्रमाला मावळी मायभक्तांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने ‘सायबर मावळी दिंडी’ उत्साहात पार पडली.

परंपरेचा अभिमान आणि डिजिटल सुरक्षेची जाणीव यांचा सुंदर संगम घडवणारी ‘सायबर मावळी दिंडी’ हा सायबर जनजागृतीचा अभिनव उपक्रम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!