राजर्षी शाहू महाविद्यालयात ‘इनडोअर मास ॲक्टिव्हिटी’द्वारे सायबर सुरक्षा जनजागृती

प्राचार्य डॉ. महादेव गवाणे यांनी सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी पुढाकार घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले; ‘इनडोअर मास ॲक्टिव्हिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद.

विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने  क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे विशेष ‘इनडोअर मास ॲक्टिव्हिटी’ चे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात आदित्य माने आणि जाधव साहील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उत्साहपूर्ण सहभाग घेत विद्यार्थ्यांना विविध कृती, संवाद आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमात सहभाग घेतला.

सायबर फसवणूक, डिजिटल सुरक्षितता, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी तसेच सुरक्षित डिजिटल सवयी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. पारंपरिक व्याख्यानापेक्षा कृतीशील आणि संवादात्मक पद्धतीने जनजागृती केल्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग आणि उत्साह विशेष पाहायला मिळाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गवाणे यांनी आदित्य माने आणि जाधव साहील यांच्या उत्साहाचे तसेच सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी घेत असलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजात डिजिटल सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्यासाठी करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ग्रुपने राबविलेला हा उपक्रम डिजिटल सुरक्षिततेचा संदेश अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!