आमदार बसवराज पाटील यांच्यासोबत सायबर सुरक्षेवर संवाद; गणेश आरतीत नागरिकांना डिजिटल सुरक्षेचे धडे

भक्तीसोबत डिजिटल सुरक्षेचीही जागरूकता” या संदेशातून लातूरमध्ये नागरिकांना सायबर फसवणुकीपासून बचाव आणि सुरक्षित डिजिटल सवयींबाबत जागरूक करण्यात आले.

वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने क्विक हील फाउंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश देण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत आदित्य माने आणि जाधव साहील यांनी आमदार बसवराज पाटील यांच्यासोबत संवाद साधत सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डिजिटल फसवणूक, ओटीपी, संशयास्पद लिंक, सोशल मीडिया सुरक्षा, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

तसेच भावरे गल्ली परिसरातील गणेश आरतीच्या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांशी संवाद साधून सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, अनोळखी लिंक किंवा फोन कॉलला प्रतिसाद देताना कोणती खबरदारी घ्यावी आणि सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी परिसरातील राजर्षी भायती नगरसेविका यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. आदित्य माने आणि जाधव साहील यांनी क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून राबविलेल्या या जनजागृती उपक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

“भक्तीसोबत डिजिटल सुरक्षेचीही जागरूकता” हा संदेश देत समाजातील विविध घटकांपर्यंत सायबर सुरक्षेची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!