क्विक हील फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून पोस्टर व रील प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकता, सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि डिजिटल जबाबदारी विकसित करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने क्विक हील फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे विशेष उपक्रम राबविण्यात आला. आदित्य माने आणि जाधव साहील यांनी इनडोअर ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून पोस्टर प्रेझेंटेशन आणि रील प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता, सायबर गुन्हे आणि डिजिटल सुरक्षा या विषयांचा अभ्यास करून आपले विचार सर्जनशील पद्धतीने मांडावेत, हा होता. विद्यार्थ्यांना केवळ माहिती ऐकण्याऐवजी स्वतः अभ्यास करून पोस्टर आणि रीलच्या माध्यमातून समाजाला सायबर सुरक्षेचा संदेश देण्याची संधी या उपक्रमातून मिळाली.
या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नव्या कल्पना, सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणारे विविध संदेश सादर केले.
क्विक हील फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर जागरूकतेसोबत नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि डिजिटल जबाबदारीची भावना विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. विद्यार्थ्यांनी स्वतः विषयाचा अभ्यास करून तो प्रभावीपणे मांडल्याने सायबर सुरक्षेचा संदेश अधिक व्यापक पद्धतीने पोहोचविण्यास मदत झाली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
