ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शिढूर आणि खरोसा गावात नाटक व संवादाच्या माध्यमातून सायबर सुरक्षा उपक्रम राबविण्यात आला.
क्विक हील फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील विद्यार्थी आदित्य माने आणि जाधव साहिल यांनी ‘आउटडोअर मास ॲक्टिव्हिटी’ अंतर्गत शिढूर आणि खरोसा गावांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी नाटकाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना सायबर फसवणूक, ऑनलाइन व्यवहारातील खबरदारी आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिला. नाटकातून सायबर सुरक्षेचे विविध विषय सोप्या, सहज समजणाऱ्या आणि प्रभावी पद्धतीने मांडण्यात आल्याने ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यानंतर आदित्य माने आणि जाधव साहिल यांनी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा केली. नागरिकांनीही दैनंदिन डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन वापराबाबत प्रश्न विचारून सायबर सुरक्षेविषयी माहिती जाणून घेतली.
ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यासाठी राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून डिजिटल व्यवहार करताना सतर्कता, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता आणि सायबर फसवणुकीपासून बचाव याबाबत ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
