डिजिटल माध्यमांचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्याचे आवाहन; जान्हवी व जाधव साहील यांच्या नाटक आणि जनजागृती उपक्रमाचे डॉ. विठ्ठल लहाने यांनी केले कौतुक.
सायबर सुरक्षा जनजागृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही डिजिटल सेफ्टीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे डॉ. विठ्ठल लहाने यांनी कौतुक केले. या उपक्रमात पुढाकार घेऊन प्रभावी जनजागृती केल्याबद्दल जान्हवी आणि जाधव साहील यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
सायबर सुरक्षा जनजागृती करताना या टीमने घेतलेला पुढाकार तसेच विविध समाजघटकांपर्यंत पोहोचविलेला डिजिटल सुरक्षेचा संदेश कौतुकास्पद असल्याचे डॉ. लहाने यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या व्यसनाधीनतेच्या समस्या, त्याचा शैक्षणिक आणि सामाजिक जीवनावर होणारा परिणाम तसेच डिजिटल माध्यमांचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याची गरज याबाबतही त्यांनी संवाद साधला.
विशेषतः मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल माध्यमांच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी वेळीच सजग राहण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल माध्यमांचा वापर करताना योग्य वेळेचे नियोजन, सुरक्षितता आणि जबाबदारी याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जान्हवी आणि जाधव साहील यांनी नाटक आणि जनजागृतीच्या माध्यमातून डिजिटल व्यसनाधीनता व सायबर सुरक्षेसारखा संवेदनशील विषय समाजासमोर मांडल्याबद्दल डॉ. विठ्ठल लहाने यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
हा उपक्रम क्विक हील फाऊंडेशनच्या वतीने सायबर सुरक्षा आणि डिजिटल सेफ्टीबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आला. विद्यार्थ्यांसोबतच पालक आणि समाजातील विविध घटकांमध्ये डिजिटल माध्यमांच्या सुरक्षित, संयमी आणि जबाबदार वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यावर या उपक्रमातून भर देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
