डिजिटल व्यसनाधीनतेवर डॉ. विठ्ठल लहाने यांच्यासोबत विद्यार्थ्यांचा संवाद

लातूरमध्ये डिजिटल साधनांच्या अतिवापराबाबत जनजागृती; आदित्य माने आणि जाधव साहील यांनी डॉ. विठ्ठल लहाने यांच्यासोबत डिजिटल व्यसनाधीनतेवर संवाद साधला.

डिजिटल साधनांचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने क्विक हील फाउंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील विद्यार्थ्यांनी डॉ. विठ्ठल लहाने यांच्यासोबत महत्त्वपूर्ण संवाद साधला.

यावेळी जाधव साहील आणि आदित्य माने यांनी डिजिटल साधनांचा अतिवापर, ऑनलाइन गेमिंग, सोशल मीडिया आणि इतर डिजिटल माध्यमांमुळे मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या व्यसनाधीनतेबाबत आपले विचार व अनुभव मांडले. विशेषतः लहान मुले आणि तरुणांमध्ये अशा सवयी कशा वाढू शकतात तसेच त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम यावर चर्चा करण्यात आली.

डॉ. विठ्ठल लहाने यांनी आपल्या वैद्यकीय अनुभवातून डिजिटल व्यसनाधीनतेशी संबंधित विविध बाबी विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या. मुलांना डिजिटल व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन, योग्य डिजिटल सवयी, वेळेचे नियोजन, मैदानी व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग आणि सातत्यपूर्ण संवाद यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

या संवादातून विद्यार्थ्यांना डिजिटल व्यसनाधीनतेकडे केवळ सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर आरोग्य आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही पाहण्याची गरज समजली.

क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमाला या संवादातून वैद्यकीय आणि व्यावहारिक मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण जोड मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!