ॲड. अजिंक्य निकम यांच्यासोबत सायबर सुरक्षेवर महत्त्वपूर्ण संवाद

क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू असलेल्या सायबर सुरक्षा अभियानाला ॲड. अजिंक्य निकम यांच्या मार्गदर्शनातून कायदेशीर आणि व्यावहारिक माहितीची जोड मिळाली.

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डिजिटल सुरक्षा आणि सायबर जनजागृतीबाबत क्विक हील फाउंडेशन तसेच राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या विद्यार्थ्यांनी ॲड. अजिंक्य निकम यांच्यासोबत महत्त्वपूर्ण संवाद साधला.

यावेळी आदित्य माने आणि जाधव साहील यांनी डिजिटल सुरक्षेबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांची माहिती देत सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षा, डिजिटल व्यवहार तसेच नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या आवश्यकतेबाबत विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.

या संवादादरम्यान ॲड. अजिंक्य निकम यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे डिजिटल व सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये समोर येणाऱ्या विविध बाबी, नागरिकांनी घ्यावयाची कायदेशीर व डिजिटल खबरदारी तसेच सायबर गुन्ह्यांची तक्रार करताना आवश्यक असलेल्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाला या संवादातून कायदेशीर आणि व्यावहारिक अनुभवाची महत्त्वपूर्ण जोड मिळाली. विद्यार्थ्यांनीही ॲड. अजिंक्य निकम यांच्या मार्गदर्शनातून सायबर गुन्हे, डिजिटल सुरक्षा आणि तक्रार प्रक्रियेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!