शिक्षक झाले सायबर सुरक्षेचे विद्यार्थी! षण्मुखेश्वर विद्यालयात शिक्षकांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत शिक्षकांना सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे धडे
तांबळा : राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत षण्मुखेश्वर विद्यालय, तांबळा येथे शिक्षकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर सत्र घेण्यात आले.
या सत्रात शिक्षकांना ऑनलाइन फसवणूक, फिशिंग व संशयास्पद लिंक, ओटीपी सुरक्षितता, मजबूत पासवर्ड, वैयक्तिक माहितीचे संरक्षण, सोशल मीडिया सुरक्षितता, मोबाइल ॲप परवानग्या आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
सायबर सुरक्षेशी संबंधित दैनंदिन व्यवहारातील विविध उदाहरणे देत शिक्षकांच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन करण्यात आले. शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले.
यावेळी सायबर वॉरियर्स नरेश पंडित आणि अविष्कार कांबळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. उडबळे एस. एम., मंडले ए. के. आणि तुमकुटे डी. ए. यांचे सहकार्य लाभले.
डिजिटल युगात शिक्षकांची सायबर सुरक्षा मजबूत झाली, तर त्यातून विद्यार्थ्यांसह संपूर्ण शैक्षणिक समुदायात सुरक्षित डिजिटल संस्कृती निर्माण होण्यास मदत होईल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
