हॉस्पिटलमध्ये सायबर जनजागृती; पोलीस निरीक्षक आवेज काझी यांच्याकडून शाबासकी
कर्मचारी व नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
लातूर : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आला. यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता, ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल आणि सोशल मीडिया फसवणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या फोन कॉल किंवा संदेशांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, श्रेयस माकणे आणि प्राची भोसले यांनी सहभाग घेत कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. डिजिटल व्यवहार करताना आवश्यक खबरदारी आणि वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत पोलीस निरीक्षक आवेज काझी यांनी सायबर वॉरियर्सचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याला शाबासकी दिली.
“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
