हॅकरचा मास्क घालून सायबर जनजागृती; लालबहादूर शास्त्री शाळेत विद्यार्थ्यांना दिला संदेश

लातूर येथील लालबहादूर शास्त्री शाळेत हॅकरचा मास्क परिधान करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, फिशिंग लिंक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत सायबर सुरक्षेचा संदेश देण्यात आला.

हॅकरच्या मास्कच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत डिजिटल जगात सतर्क आणि जबाबदार राहण्याचा सायबर सुरक्षेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

लातूर : सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी लालबहादूर शास्त्री शाळेत अनोख्या पद्धतीने सायबर जनजागृती करण्यात आली. हॅकरचा मास्क परिधान करून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे धोके तसेच डिजिटल जगात वावरताना घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी फ्रॉड, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया फसवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी व पासवर्ड कोणालाही सांगू नये तसेच संशयास्पद संदेश आणि फोन कॉलपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.

क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि नरेश पंडित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले.

हॅकरचा मास्क आणि सायबर सुरक्षेचा संदेश या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली. मनोरंजक आणि संवादात्मक पद्धतीने दिलेल्या संदेशामुळे डिजिटल जगात सतर्क आणि जबाबदार राहण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!