जळगाव ITIमध्ये महिला विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षा सत्र. ऑनलाइन बँकिंग, बनावट कस्टमर केअर कॉल, सोशल मीडिया फसवणूक आणि फिशिंग लिंकपासून बचावाचे मार्गदर्शन.
डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी तसेच वाढत्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत महिला विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जळगाव येथे संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान स्नेहल पाटील, वैष्णवी पाटील, अक्षय पाटील आणि लोकेश पाटील यांनी महिला विद्यार्थिनींशी संवाद साधत सायबर फसवणुकीच्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल व्यवहार करताना कोणत्या प्रकारच्या फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते आणि त्यापासून बचावासाठी कोणती खबरदारी घ्यावी, हे प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले.
OTP, QR कोड आणि AI व्हॉइस कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन
सत्रात OTP द्वारे फसवणूक, QR कोडद्वारे फसवणूक, AI व्हॉइस कॉलद्वारे फसवणूक, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या सायबर गुन्ह्यांच्या पद्धतींची माहिती देण्यात आली. 
ऑनलाइन व्यवहार करताना OTP, PIN किंवा बँक खात्याशी संबंधित संवेदनशील माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच संशयास्पद अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच ऑनलाइन खात्यांच्या सुरक्षिततेसाठी मजबूत पासवर्डचा वापर आणि द्वि-स्तरीय प्रमाणीकरण (2FA) सुरू ठेवण्याचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले.
Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन
यावेळी विकसित करण्यात आलेल्या Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करण्यात आले. या अॅपच्या वापराबाबत महिला विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर कसा करता येईल, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
उपक्रमाच्या शेवटी महिला विद्यार्थिनींनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे जनजागृती उपक्रम प्रभावी ठरला.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. आर. बी. आमले सरांचे मार्गदर्शन लाभले. महिलांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सजग राहावे आणि सायबर फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपायांचा अवलंब करावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
