अनंत तुळजाराम नाईक विद्यालय, नळेगाव येथे सायबर सुरक्षेचा जागर; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक आणि सोशल मीडिया सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन

नळेगावातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन.

“सावधानता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी” या संदेशातून नळेगावातील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित डिजिटल वापराबाबत जनजागृती करण्यात आली.

नळेगाव : डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अनंत तुळजाराम नाईक विद्यालय, नळेगाव येथे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP आणि वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर न करणे, संशयास्पद फोन व संदेशांपासून सावध राहणे तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करणे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, श्रेयस माकणे आणि प्राची भुसले यांनी सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत डिजिटल माध्यमांचा वापर करताना घ्यावयाची काळजी आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत जनजागृती केली.

विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध बाबी जाणून घेत सक्रिय सहभाग नोंदविला. “सावधानता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी” असा संदेश देत विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आणि कोणतीही संशयास्पद ऑनलाइन घटना घडल्यास तत्काळ विश्वासू व्यक्ती किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!