सायबर सुरक्षा जनजागृतीच्या कार्याची दखल घेत शारदा पॉलिटेक्निक कॉलेज, औराद-शहाजानीच्या वतीने नरेश पंडित यांचा सत्कार करण्यात आला.
राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत शारदा पॉलिटेक्निक कॉलेज, औराद-शहाजानी येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, सोशल मीडिया सुरक्षितता, मजबूत पासवर्ड, ओटीपी तसेच वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या सत्रात सायबर वॉरियर्स नरेश पंडित आणि अविष्कार कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत डिजिटल जगात सुरक्षित आणि जबाबदारीने वावरण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले.
सायबर सुरक्षा जनजागृतीच्या कार्याची दखल घेत नरेश पंडित यांचा शारदा पॉलिटेक्निक कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या जनजागृतीपर कार्याचे कौतुक करत महाविद्यालयाच्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य कळमासे एस. बी., शैक्षणिक समन्वयक राठोड पी. एस. आणि विभागप्रमुख वतने एस. बी. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
