“खेळातून शिकूया, सायबर फसवणुकीपासून वाचूया!” या संदेशातून लातूरमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी गेम्स आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने सायबर जनजागृती करण्यात आली. मनोरंजक आणि संवादात्मक पद्धतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन जगातील संभाव्य धोके तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, बनावट संदेश, ओटीपी फसवणूक आणि सोशल मीडिया सुरक्षितता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सायबर वॉरियर्स नरेश पंडित आणि अविष्कार कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, संशयास्पद संदेशांपासून सावध राहणे आणि सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.
क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.
“खेळातून शिकूया, सायबर फसवणुकीपासून वाचूया!” असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
