ओटीपी, बँकिंग व वैयक्तिक माहिती शेअर न करणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे आणि संशयास्पद कॉलपासून सावध राहण्याचा संदेश महिला बचत गटाच्या सदस्यांना देण्यात आला.
राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर आणि क्विक हील फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांना दैनंदिन डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षितता कशी राखावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सायबर वॉरियर नरेश पंडित यांनी मजबूत आणि सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा, पासवर्डमध्ये मोठी व छोटी अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हांचा योग्य वापर कसा करावा, याबाबत सोप्या उदाहरणांसह माहिती दिली. तसेच नाव, जन्मतारीख किंवा सहज ओळखता येणारी वैयक्तिक माहिती पासवर्ड म्हणून वापरू नये, असे आवाहन करण्यात आले.
याशिवाय ओटीपी, बँकिंगची माहिती आणि वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच संशयास्पद फोन कॉल किंवा संदेशांपासून सावध राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.
महिला बचत गटाच्या सदस्यांनीही उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत डिजिटल सुरक्षिततेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांचे निरसन करताना “मजबूत पासवर्ड ठेवा, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा आणि डिजिटल व्यवहार करताना नेहमी सतर्क राहा,” असा संदेश देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
