ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे; इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन गेमिंग, फेक लिंक आणि OTP फसवणुकीपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन

इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल धोक्यांपासून सुरक्षित राहण्याचे मार्गदर्शन.

“स्मार्ट बना, पण डिजिटल जगात सुरक्षित राहा” या संदेशातून विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून बचावाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

लातूर : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन जगात सुरक्षित आणि जबाबदारीने वावरणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र येथे इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी Quick Heal Foundation यांच्या वतीने सायबर वॉरियर्स नम्रता तौर, नेहल बुलानी, परमेश्वर पांद्रे आणि जाधव साहील यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले.

मार्गदर्शनादरम्यान ऑनलाइन गेमिंग, बनावट लिंक, OTP फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तसेच अनोळखी व्यक्तींकडून येणारे संशयास्पद मेसेज आणि फोन कॉल याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर न करण्याचे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून उत्तरे देत डिजिटल माध्यमांचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

“स्मार्ट बना, पण डिजिटल जगात सुरक्षित राहा!” असा संदेश देत विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद ऑनलाइन घटना घडल्यास पालक, शिक्षक किंवा संबंधित यंत्रणेची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!