क्विक हील फाउंडेशनच्या टीमची डॉ. विठ्ठल लहाने यांच्याशी विशेष भेट
लातूर : क्विक हील फाउंडेशनच्या वतीने प्राजक्ता आणि योगिता यांच्या टीमने प्रसिद्ध डॉक्टर डॉ. विठ्ठल लहाने यांची विशेष भेट घेतली. या भेटीदरम्यान डिजिटल साक्षरता, सायबर गुन्ह्यांचे मानसिक व सामाजिक परिणाम तसेच अशा घटनांचा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर संवाद साधण्यात आला.
यावेळी टीमने डिजिटल जगात वावरताना कोणती काळजी घ्यावी, डिजिटल गैरवापरामुळे व्यक्तीच्या मानसिकतेवर, कौटुंबिक परिस्थितीवर तसेच दैनंदिन जीवनावर कोणते परिणाम होऊ शकतात, याबाबत डॉ. विठ्ठल लहाने यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून समोर आलेल्या प्रकरणांबाबतही टीमने माहिती जाणून घेतली.
डिजिटल साक्षरता आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती करताना नागरिकांनी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात, तसेच सायबर घटनेनंतर संबंधित व्यक्तीला मानसिक आधार आणि योग्य मार्गदर्शन कसे मिळावे, याबाबत डॉ. लहाने यांनी मार्गदर्शन केले.
क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाची डॉ. विठ्ठल लहाने यांनी दखल घेतली. डिजिटल सुरक्षिततेबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी टीमनेही आपल्या सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाची माहिती डॉ. लहाने यांना दिली.
या संवादात्मक भेटीत योगिता, प्राजक्ता, साहिल जाधव, परमेश्वर पांढरे, नेहल बुलानी आणि नम्रता तोर यांची उपस्थिती होती. या भेटीतून सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता आणि सुरक्षित डिजिटल वापराबाबत समाजात जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
