“भक्तीबरोबरच डिजिटल सुरक्षेचीही काळजी घेऊया” या संदेशातून लातूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त डिजिटल सुरक्षा जनजागृती उपक्रम घेण्यात आला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने क्विक हील फाउंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या वतीने विशेष आऊटडोअर अवेअरनेस अॅक्टिव्हिटी घेण्यात आली.
या उपक्रमादरम्यान आदित्य माने आणि जाधव साहील यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत डिजिटल सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, बनावट लिंक, सोशल मीडिया सुरक्षा, अनोळखी फोन कॉल व संदेश, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता तसेच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असताना “भक्तीबरोबरच डिजिटल सुरक्षेचीही काळजी घेऊया” हा संदेश देत क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून हा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
डिजिटल युगात प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे, ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक खबरदारी घेणे आणि सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
