निलंगा येथील विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहार, सोशल मीडिया सुरक्षा आणि वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करण्याचे धोके याबाबत आदित्य माने व जाधव साहील यांनी मार्गदर्शन केले.
डिजिटल युगात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण करावे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करावेत, या उद्देशाने क्विक हील फाउंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवश्री महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला २५०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी आदित्य माने आणि जाधव साहील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेच्या विविध महत्त्वपूर्ण बाबी सोप्या मराठी भाषेत समजावून सांगितल्या.
विद्यार्थ्यांना ओटीपी फसवणूक, फिशिंग, बनावट लिंक, ऑनलाइन गेमिंग स्कॅम, सोशल मीडिया सुरक्षा, मजबूत पासवर्ड, अनोळखी व्यक्तींकडून येणारे मेसेज व फोन कॉल, फोटो मॉर्फिंग, डीपफेक, व्हॉइस क्लोनिंग तसेच वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करण्याचे धोके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
डिजिटल जगाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी आणि सायबर फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून राबविण्यात येणाऱ्या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारून संवाद साधला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
