ममता हॉस्पिटलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; पोलीस निरीक्षक आवेज काझी यांचे मार्गदर्शन; कर्मचारी व नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

ममता हॉस्पिटल, लातूर येथे कर्मचारी व नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, डिजिटल व्यवहार आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

‘सावधानता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी’ या संदेशासह ममता हॉस्पिटलमध्ये डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन.

लातूर : डिजिटल युगात वाढत असलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता हॉस्पिटलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक आवेज काझी यांनी उपस्थितांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP व बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही न देणे, संशयास्पद फोन व संदेशांपासून सावध राहणे तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, श्रेयश माकणे आणि प्राची भोसले यांनी सहभाग घेतला. त्यांनी उपस्थितांना ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक खबरदारी घेण्याबाबत माहिती दिली.

“सावधानता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी” असा संदेश देत डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षितपणे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सायबर फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता, सतर्कता आणि सुरक्षित डिजिटल सवयी आवश्यक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!