क्विक हील फाउंडेशनच्या Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करत विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल व्यवहार, मजबूत पासवर्ड आणि 2FA वापराबाबत मार्गदर्शन.
डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी तसेच सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU), जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने Institute of Management and Research College, Jalgaon येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्रादरम्यान स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर फसवणुकीच्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. OTP फसवणूक, QR कोडद्वारे होणारी फसवणूक, AI व्हॉइस कॉल, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक आणि सोशल मीडिया फसवणूक यांसारख्या प्रकारांची माहिती प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आली.

ऑनलाइन व्यवहार करताना OTP, PIN किंवा बँक खात्याशी संबंधित संवेदनशील माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये, अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, तसेच कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासावी, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. यासोबतच मजबूत पासवर्ड वापरणे आणि Two-Factor Authentication (2FA) सुरू ठेवण्याचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
यावेळी क्विक हील फाउंडेशनतर्फे विकसित Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन करण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या प्रकारे मदत मिळू शकते, तसेच अॅपचा वापर कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता आणि डिजिटल सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हे जनजागृती सत्र प्रभावी ठरले.
या उपक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
