अनोळखी लिंक, संशयास्पद कॉल आणि गोपनीय बँकिंग माहिती शेअर न करण्याबाबत परमवीर गणेश मंडळातील नागरिकांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन.
लातूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परमवीर गणेश मंडळात सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
उपक्रमादरम्यान अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP तसेच बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही न देणे, संशयास्पद फोन व संदेशांपासून सावध राहणे आणि सोशल मीडियाचा सुरक्षितपणे वापर करणे याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित आणि श्रेयश माकणे यांनी सहभाग घेत नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले. डिजिटल व्यवहार करताना घाई न करता प्रत्येक संदेश, लिंक किंवा कॉलची खात्री करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
“गणेशोत्सवाचा उत्साह जपूया, डिजिटल व्यवहारातही सावध राहूया!” असा सायबर सुरक्षेचा संदेश यावेळी देण्यात आला. गणेशोत्सवाच्या उत्साहासोबतच डिजिटल व्यवहारांमध्येही नागरिकांनी जागरूक आणि सतर्क राहावे, यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
