लातूरच्या डिजिटल सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी सायबर सुरक्षेबाबत संवाद

‘डिजिटल सुरक्षित लातूर’साठी विद्यार्थी, प्रशासन आणि संबंधित संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज; जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्यासोबत सायबर सुरक्षेवर संवाद.

लातूर : लातूर शहराला डिजिटलदृष्ट्या अधिक सुरक्षित आणि सायबर गुन्ह्यांबाबत सजग करण्याच्या उद्देशाने क्विक हील फाउंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या विद्यार्थ्यांनी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड (IAS) यांची भेट घेऊन सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण संवाद साधला.

यावेळी आदित्य माने, जाधव साहील तसेच क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी कार्यरत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. लातूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, शाळा-महाविद्यालये आणि विविध घटकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती वाढविण्यासाठी कोणते उपक्रम राबविता येतील, यावर यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, बनावट लिंक, ओटीपी फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षेसह विविध सायबर धोक्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतही चर्चा झाली.

तसेच लातूर शहरात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम आणि कार्यक्रमांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून ‘डिजिटल सुरक्षित लातूर’ घडविण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला.

राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने राबविलेल्या विविध सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमांची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांना दिली. लातूरच्या डिजिटल सुरक्षेसाठी विद्यार्थी, प्रशासन आणि संबंधित संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!