फातिमा कन्वेंट स्कूल, लातूर येथे सायबर सुरक्षेचा जागर

लातूर येथील फातिमा कन्वेंट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, ओटीपी, सोशल मीडिया आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली.

“सावधानता, जागरूकता आणि सुरक्षित डिजिटल सवयी” या संदेशातून फातिमा कन्वेंट स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.

 वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षा आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहाराबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने फातिमा कन्वेंट स्कूल, लातूर येथे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये, अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. तसेच संशयास्पद फोन कॉल, संदेश आणि आकर्षक ऑनलाइन ऑफर्सपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि प्राची भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारून आवश्यक माहिती जाणून घेतली.

“सावधानता, जागरूकता आणि सुरक्षित डिजिटल सवयी यामुळेच सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण शक्य आहे,” असा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!