डिजिटल युगात सतर्कता आणि जबाबदार डिजिटल वर्तनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारत सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, लातूर येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. क्विक हील फाउंडेशनच्या वतीने आयोजित या उपक्रमात राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील विद्यार्थी नम्रता तोर, नेहल बुलानी आणि साहिल जाधव यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी व पासवर्डची सुरक्षितता, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, फिशिंग, वैयक्तिक माहितीचे संरक्षण तसेच डिजिटल उपकरणांचा जबाबदारीने वापर याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. बदलत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण कसे करावे, याचे विविध उदाहरणांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
कोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारले. डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी सतर्कता, योग्य माहिती आणि जबाबदार डिजिटल वर्तन किती महत्त्वाचे आहे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली.
क्विक हील फाउंडेशन आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना “सुरक्षित डिजिटल वापर ही काळाची गरज” याची जाणीव झाली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
