श्रीराम विद्यालयात सायबर सुरक्षेचा जागर; २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतले धडे

सरोळा येथील श्रीराम विद्यालयातील २५० हून अधिक विद्यार्थ्यांना योगिता जाधव आणि प्राजक्ता बोरूळे यांचे सायबर सुरक्षा व सुरक्षित इंटरनेट वापराबाबत मार्गदर्शन.

श्रीराम विद्यालयात सायबर सुरक्षेचा जागर; २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतले धडे

‘डिजिटल जगात प्रत्येक क्लिक जबाबदारीने’चा संदेश; सोशल मीडिया, ऑनलाइन फसवणूक आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन

सरोळा : डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता श्रीराम विद्यालय, सरोळा येथे २५० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी सायबर वॉरियर योगिता जाधव आणि सायबर वॉरियर प्राजक्ता बोरूळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, अनोळखी व्यक्तींकडून येणारे संदेश व लिंक, वैयक्तिक माहितीची गोपनीयता, ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली.

डिजिटल माध्यमांचा वापर करताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे, वैयक्तिक माहितीची गोपनीयता जपणे आणि संशयास्पद संदेशांपासून दूर राहणे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

यावेळी ‘डिजिटल जगात प्रत्येक क्लिक जबाबदारीने’ हा संदेश देत विद्यार्थ्यांना सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले आणि सत्राला चांगला प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!