अलमला जिल्हा परिषद शाळेत सायबर सजगतेचा धडा; २०० हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
‘सावध क्लिक, सुरक्षित डिजिटल जीवन’चा संदेश; ऑनलाइन फसवणूक आणि संशयास्पद लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन
अलमला : डिजिटल युगात वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळा, अलमला येथे २०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी सायबर वॉरियर योगिता जाधव आणि सायबर वॉरियर प्राजक्ता बोरूळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी, अनोळखी लिंक व संदेशांपासून सावध राहण्याचे उपाय, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या पद्धती तसेच ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली.
डिजिटल माध्यमांचा वापर करताना कोणतीही लिंक किंवा संदेश उघडण्यापूर्वी त्याची खात्री करणे, वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना न देणे आणि संशयास्पद ऑनलाइन व्यवहारांपासून दूर राहणे याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
यावेळी ‘सावध क्लिक, सुरक्षित डिजिटल जीवन’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत डिजिटल जगात जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वावरण्याचे आवाहन करण्यात आले.
या सत्राला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करून संवाद साधला आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
