लातूरमधील ग्रामीण भागातील शाळांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या संयुक्त उपक्रमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, फिशिंग लिंक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत सायबर जनजागृती करण्यात आली.

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून विद्यार्थ्यांना अनोळखी लिंक, संशयास्पद संदेश आणि फोन कॉलपासून सावध राहण्याचे तसेच डिजिटल माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

 वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर लातूरमधील ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया फसवणूक तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, तसेच ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. संशयास्पद संदेश किंवा अनोळखी फोन कॉलपासून सावध राहण्याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, श्रेयस माकणे आणि प्राची भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले.

“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. डिजिटल जगात वावरताना सजग राहून सुरक्षित डिजिटल सवयी अंगीकारण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!