“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून विद्यार्थ्यांना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची व वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
लातूर : क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत श्रेयस बॉईज हॉस्टेल, लातूर येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी फ्रॉड, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया फसवणूक तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल व्यवहार करताना कोणती खबरदारी घ्यावी आणि संभाव्य सायबर धोके कसे ओळखावेत, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच संशयास्पद फोन कॉल आणि संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले.
या उपक्रमात सायबर वॉरियर्स नरेश पंडित आणि श्रेयस माकणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत डिजिटल व्यवहारातील सुरक्षिततेबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
