ऑनलाइन गेम्समधील बनावट ऑफर्स, खोटे रिवॉर्ड्स आणि वैयक्तिक माहिती मागणाऱ्या संदेशांपासून मुलांनी सावध राहावे, असा संदेश देत लातूरमध्ये सायबर जनजागृती करण्यात आली.
ऑनलाइन गेमिंगचा वाढता वापर लक्षात घेता लहान मुलांना गेम खेळताना होणाऱ्या संभाव्य सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करण्यात आली. ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून येणाऱ्या संशयास्पद लिंक, बनावट ऑफर्स, खोटे रिवॉर्ड्स तसेच वैयक्तिक माहिती मागणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याबाबत मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि नरेश पंडित यांनी मुलांशी संवाद साधत ऑनलाइन गेम खेळताना अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करू नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी पालकांची परवानगी घ्यावी, असे सांगितले.
गेमिंगदरम्यान आकर्षक ऑफर्स, मोफत रिवॉर्ड्स किंवा गेममधील सुविधा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा संशयास्पद संदेशावर विश्वास न ठेवता पालक किंवा विश्वासू व्यक्तीला त्याबाबत माहिती द्यावी, असेही यावेळी समजावून सांगण्यात आले.
क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.
“गेम खेळा, पण सावध राहा; डिजिटल सुरक्षितता हीच खरी सुरक्षा!” असा संदेश मुलांना देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
