‘हॅकर मास्कचा थरार, सायबर सुरक्षेचा संदेश!’ या संकल्पनेतून लातूरमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि सुरक्षित ऑनलाइन वर्तनाचा संदेश पोहोचविण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत उत्सुकता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘हॅकर मास्क गेम्स’द्वारे अनोख्या पद्धतीने सायबर जनजागृती करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना डिजिटल जगातील संभाव्य धोके तसेच सुरक्षित ऑनलाइन वर्तनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
हॅकर मास्कच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे प्रतीकात्मक सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया फसवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी व पासवर्ड कोणालाही न सांगणे तसेच संशयास्पद कॉल आणि संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि नरेश पंडित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले.
“हॅकर मास्कचा थरार, सायबर सुरक्षेचा संदेश!” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल सुरक्षेचा संदेश मनोरंजक आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
